ये तुला कवितेत टिपून घेते

ये तुला कवितेत टिपून घेते

.

अग!! अग!! अग!!
थांब जरा
कसली ही धुंदी
कसला हा थरार
कुठले हे रोमांच

नक्की काय झालंय
कुठे आहे मी

असून नसल्या सारखी
ना कोणती वेदना
ना वेदनेची जाणीव

तरंगती आहे जणू
अक्षरशहा आकाशात
मऊ मुलायम ढगावर बसून
शब्दांच्या सरी गुंफत

अग! अग! अग! ....
सावर जरा
बघ किती भिजलीस

ये जवळ ये!!
तुला कवितेत टिपून घेते.

स्वाती फडणीस ...................२३-०२-२००८