दीपक बनून जगायला हवं.

दीपक बनून जगायला हवं.

ठिणगी ठिणगी वाहून
ज्योत तर तेवली.
आता तिच्या भोवती,
दहा बोटांचं कोंदण करायला हवं.

डोळ्यात तेल घालून जपायला हवं.

तेल संपेल,
पुन्हा पुन्हा भरायला हवं.

वारा येईल,
ज्योत फडफडेल, जाणून राहायला हवं.

धूर उठेल,
त्याला आकाश दाखवायला हवं.

अंधार तर असणारच!
अंधाराला दूर सारत प्रकाशायला हवं.

वात संपेपर्यंत तेवत राहायला हवं.
दीपक बनून जगायला हवं.
ज्योत बनून जळायला हवं.
जळायला हवं........................

स्वाती फडणीस...................................२४-०२-२००८