उरल्या आय़ुष्यावरी माझ्या.....

प्राक्तनातच ज्याच्या ओहोटी
सखे मी असा आता कीनारा
जगतो दुख:च्या वाळुसवे मी
सावरीत आसवांचा पसारा

माझिया गीतांचा सखे गं
तुझ्या ओठी का अजुनी जाप
शाप तेव्हा तुच दिलास
मग अता का देतेस उ:शाप

तु हे विसर आता की
मी तुझ्यावर प्रेम केले
स्थिरले ते कधीच नक्षत्री
अज्ञाती ते कधीच गेले

आठवातल्या धुक्यात उमटती
सखे हाक कुणाची ते कळॆना
लागते चाहुल तुझ्या पावलांची
पण चेहरा तो तुझा दिसेना

उरल्या आय़ुष्यावरी माझ्या
सखे दुख: लाविते गं दावा
अश्रु माझेच साक्ष देती
अन वेदनाही देते गं पुरावा

-सचिन काकडे[जानेवारी २१,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच "हा खेळ सावल्यांचा"