स्वत:शीच संवाद माझे

स्वत:शीच संवाद माझे

आज उठायचेच नव्हते !
नव्हते बघायचे काटे.
"खूपसे संवाद साठलेले"
विधात्याशीच बोलायचे होते.........

त्याची वाट बघत पडले,
त्यालाही वेळ कुठे.
पडून पडून अंग आंबले,
म्हणून वाटले फिरुन यावे !

शरिराचे का वागवा ओझे?
"ते राहूदे की आहे तिथे".
आता माझी मी उरले !!
"स्वत:शीच संवाद माझे".........

माझे मीच ऐकते, हुंकारते!!!!!

स्वाती फडणीस......................२००७