पक्का वडा

  • मैदा१\२किलो, तिखट, काळी मिरी पावडर ,ओवा, बडी शेप पावडर-चवीनुसार
  • हिंग१\२चमचा, बारीक वाटलेला १ कांदा व लसणाचा गड्डा, मीठ चवीनुसार
  • तळण्याकरिता तेल,
१ तास
आवडीनुसार

एका भांड्यात मैदा घ्या व भांड्याचे तोंड कपड्याने बांधा. भांड कुकरमध्ये ठेवा व मंद गॅसवर प्रेशर न लावता ४० मि. वाफवून घ्या. थंड झाल्यावर इतर सगळे जिन्नस घाला व पाण्याने सैलसर (पोळ्यांच्या कणकेपेक्षा सैल पण भज्यांच्या पीठाइतके सैलही नको)पीठ भिजवून घ्या. सोऱ्याला पापडीची तबकडी लावून  त्यात पीठ टाकून शेवेप्रमाणे तळून घ्या.ह पदार्थ चहा बरोबर चांगला लागतो.

कमी तेलात होणारा व टिकणारा हा पदार्थ आहे. चकलीच्या ऐवजी एखाद्यावेळेस करून पाहायला हरकत नाही.

मंजुषाच्या कुकरी शोमध्ये शिकले