पौष्टिक रंगीत पराठे

  • २ वट्या कणिक, चवी पुरते मिठ, १ चमचा साखर
  • प्रत्येकी २ छोटे चमचे किसलेले गाजर, बिट, कोबी
  • १ चमचा आल, लसुण, मिरची पेस्ट
  • २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
  • पाव चमचा ओवा, मळण्या पुरते तेल, पाणी
  • साजुक तुप, चीज किसुन सजवण्यासाठी
१५ मिनिटे
५ जणांसाठी

वरील साजुक तुप आणि चीज सोडुन सर्व जिन्नस एकत्र करुन चांगले मळुन घ्या. थोड जाडसरच ठेवा. मग पराठे लाटुन मध्यम गॅसवर भाजा, वरुन साजुक तुप सोडा. झाल्यावर वरुन चिज हवे असल्यास पसरवा.

हे पराठे करायला सोपे, पौष्टीक व दिसायला आकर्षक होतात कोबी, गाजर, बिट न आवडणारी मुले व माणसेही हे पराठे ताव मारुन खातात.

स्वतः .