ज्वाला
त्या उंच कड्याच्या टोकाशी...
मी एकटी,
माझ्यात हरवलेली.
चहू बाजूने वेढून राहिलेली रात्र
खाली वर ,
काळं निळं साकळलेलं आकाश
चमकणार्या तारका,
चमकणारी आशा,
मध्येच ये जा करणारी शुद्ध
मी अंधारात.
अंधार!!
अंधार, तोही अखंड कुठाय!!
तो ही विखुरलाय,
माझ्यासारखा.........
आशेच्या चांदण्यात,
उधारीच्या प्रकाशात,
तूही जळतोयस का बाबा
काजळतय आकाश
अस मिणमिणतं नको जळूस
पेटून ऊठ!!
ज्वाला हो ज्वाला !!
आणि जाळून टाक अंधार
मSSSSSSSSS हSSSSS
हा असा....
चल आता
त्या टेकडीवर
तो अंधार तिकडे लपलाय!!
स्वाती फडणीस ............................. ०४-०३-२००८