टिम इंडिया.

त्रिवार वंदन तुला महेंद्रा,

त्रिवार वंदन तुला.

तुझ्या संयमी नेतृत्वाला,

तुझ्या टिमच्या कतृत्वाला

त्रिवार वंदन विजयश्रीला.     १

एकोपा-विश्वास गमक हे,

तुझ्या उत्तुंग यशाचे,

कांगारूंना खडे चारशी

नमवूनी त्यांच्या देशी.        २

तिरंग्याची तू शान राखिशी

ऐतिहासिक हि नोंद जयाची,

जिंकूनी तू तर जिंकिलेस  रे,

भारतीयांच्या मना.     

आंम्हा भारतीयांच्या मना.      ३

अलकाताई.