कळे ना!

हळुवार भावना त्या

थिजल्या कुठे कळेना,

अलवार स्वप्नं सारी

मिटली कुठे कळेना,

प्रेमाच्या गावा जावे

तर पाऊल का वळेना,

शांती ना जिवाला

मन स्थिर का वसेना,

प्रेमात पडावे परतुनी,

तर प्रियाही दिसेन.