किरणफूलं

किरणफूलं

क्षण पुढे पुढे पळणारे
ओंजळीतले हसरे
चकवे, किरण फूलं ते
धरता पळते, मोहे.
सोडता मी हरवती ते.
सुख-दु:खाचे असे कवडसे
आपणच आसूसून जगावे
क्षण पुढे पुढे पळणारे
आपल्या, आपल्या हातातले

स्वाती फडणीस............................२००६