मी मरण ... एक भीती


मी मरण ... एक भीती
आव्हान मज देवू नको
जीवनच्या वाटेवर या
सरण तुझ सजवू नको

प्राण तुझ्यात जो आहे
तो तरी कुठे तुझाच आहे
आरंभ तो माझाच
शेवट मी अटळ आहे

गरम रक्तात तुझ्या
कुठले रे शौर्य जडले
शब्दा शब्दा वेड्या
अहंकारचेच कौर्य दडले

शेवटी तू काय सांगतो
शेवट तुझा माझ्यात आहे
प्रारब्धाच्या कसल्या गोष्टी
नियतीचा तू गुलाम आहे

म्हनुन
मी मरण ... एक भीती
आव्हान मज देवू नको
जीवनच्या वाटेवर या
सरण तुझ सजवू नको

--------- गणेशा