नैवेद्य

दरुड्याच्या देवाला नैवेद्य दरूचा

पिता पिता म्हणतो प्रसाद शंकराचा

शंकर पितो म्हणून रिचवला पेल्यावर पेला

अरे शंकराने पचवला विषाचाही पेला

सोमरस पिऊन देवांनी आमरत्व मिळवले

तो सोम वेगळा होता ही दारू नक्की नव्हे

दारू पिऊन दीर्घायुष्य नाही कधी ऐकले

दारूने सत्यनाश हे मात्र अनुभवले

शंकर तसा होता म्हणून पार्वतीने स्वीकारला

असा हा ही शंकर आज आम्ही आपला म्हटला