शोध

तुला शोधले;
स्वतः हरवलो,
रस्ता चुकलो...

वेगवेगळ्या
दिशादिशांना
खूप भटकलो...

परत फिराया
जमले नाही
इतका थकलो...

काय करावे
अता यापुढे
समजत नाही...

जगण्याचे हे
ज्ञान मला का
उपजत नाही?...