सोडलेस तिला एकटी
ह्या जिवनाच्या वाटेवरती
फूल होते हाती तुझ्या
तिला टोचलेस काटे किती...
बोचता काटे तिच्या मनाला
का होते वेदना तुजला
जसे नाही सोडत नभ धरतीला
मग का तोडलेस तुज प्रेमाला..?
तूच लावलेस वेड तिला
विसरली सर्व काही प्रेमात तुझ्या..
पण धिक्कारलेस तु असे तिला
जणू कचरा आहे ती मनातील तुझ्या..
तरी पण वेडा आहेस तू
अजुनही तिच्यावर प्रेम करतोस..
तुला ती मिळावी म्हणून
३३ कोटी देवांसमोर साकड घालतोस..
पण घडून गेलेल्या गोष्टी
परत नाही घडत..
कारण एकदा वाळवी लागलेले मन
परत नाही टवटवीत होऊ शकत....
ग़िरीश...