मैफल

रंगायची नेहमीच
तशीच आजही रंगलेली मैफल,
तू समेवर येताना
तुझ्या सुरात सुर मिसळत,
तानपु-याची साथ करणारी मी
देहभान विसरून गाण्यामधे हरवलेला तू
.
.
.
मी हळूच उतरवला तानपुरा
मैफल रंगलेली...