वसंत

रंग वेड्या वसंतात

गुलाल होळीचा उधळला

सुर वेड्या वसंतात

स्वर कोकिळेचा निनादला

गंध वेड्या वसंतात

गंध मोगऱ्याचा दरवळला

बहर वेड्या वसंतात

बागा फुलांच्या बहरल्या

तरुण वेड्या वसंतात

चैत्र-पालवीने फांद्या नटल्या

आहे वसंत वेडा पण

त्याचे वेड निसर्गाला

- हेमु