मिडियाविकिची उपयूक्तता(बीटाविकि काय आहे? भाग २)

पहिल्या भागात मिडियाविकि सॉफ्टवेअर आणि बीटाविकिचा थोडक्यात परिचय दिला. जरी विकिपीडिया संकेतस्थळही मिडियाविकि सॉफ्टवेअर वापरून चालते तरी तो उल्लेख मुद्दाम टाळला कारण विकिपीडिया शब्दाची एक विशिष्ट प्रतिमा आहे ती सर्वांना भावतेच असे नाही. आणि मिडियाविकि सॉफ्टवेअर व त्याचे विस्तार, विकिपीडियापेक्षा  वेगळ्या तऱ्हेने  संकेतस्थळांची रचना करण्याकरिता देखील वापरता येऊ शकते.

छोट्या समूहांना बऱ्याचदा संकेतस्थळे वारंवार बदलणे अवघड जाते मग ती कंटाळवाणी होतात नवे बदल नाही म्हणून फारसे कुणी भेटही देत नाही व ऍक्टिव्ह वेबमास्टर इनऍक्टीव्ह झाल्यास संकेतस्थळावर नामुष्कीची अवस्था आल्याचे आपण बऱ्याचदा पाहतो. त्यास कदाचित  मिडियाविकि सॉफ्टवेअर आधारीत संकेतस्थळे चांगला पर्याय ठरू शकतात. उदाहरणार्थ मिलिंद भांडारकरांचे शब्दभांडार हे संकेतस्थळ मिलिंद भांडारकर यांनी स्वतः सतत वेळ दिला नाही तरी चालू राहते. महाराष्ट्र मंडळे,  महाविद्यालयीन विद्यार्थी समूहांकरिता , सोसायट्या आणि कदाचित स्थानिक प्रशासनांना स्थानिक लोकसमूहाचा अधिक सहभाग आणि प्रशासनाचे अधिक लोकशाहीकरण करण्यास अशा स्वरूपाची संकेतस्थळे वापरता येतील असे वाटते.

त्या शिवाय आधीच्या लेखात बीटाविकिबद्दल लिहिल्या प्रमाणे  नियंत्रित पण वेगाने भाषांतर करण्यास तसेच साचे (टेंप्लेटस) वापरून आंतर-देवनागरी भाषा भाषांतरांसाठी हे सॉफ्टवेअर चांगलेच उपयुक्त ठरू शकेल असा  माझा कयास आहे.मराठी आणि हिंदी भाषेत   विभक्ती प्रत्यय फक्त बदलले तर करावयाचे भाषांतरण फारच थोडे शिल्लक राहते.त्याप्रमाणेच मराठी-कोकणी बदल सुद्धा सहज घडवता येतील असा माझा कयास आहे. फक्त पुढाकार  इनिशिएटीव्हची आवश्यकता आहे.

त्या शिवाय विक्शनरीने मिडियाविकिच्या माध्यमातून शोधणाऱ्याला शब्दार्थ शोधणे अधिक सोपे जाते  असे दाखवून दिले आहे.

अजून अधिक पुढील लेखात

-विकिकर