आंब्याची डाळ

  • २वाट्या चण्याची डाळ
  • पाव ते अर्धी वाटीच्या मध्ये कैरीचा कीस (कैरीच्या आंबटपणानुसार प्रमाण कमी जास्त करणे)
  • ६/७हिरव्या मिरच्या,
  • ओले खोबरे,कोथिंबिर
  • फोडणीचे साहित्य,तेल,मीठ,साखर
४५ मिनिटे
३.४ जणांसाठी

चण्याची डाळ ४/५ तास भिजत घालावी.रोळीत उपसून घावी आणि पाणी पूर्ण निथळू द्यावे.डाळ मिक्सरवर थोडी भरडच वाटावी, वाटताना त्यात मिरच्याही घालाव्यात.
ही वाटलेली डाळ+मिरच्या,कैरीचा कीस एकत्र करून त्यात ओले खोबरे,कोथिंबिर,चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घालावी.तेलाची खमंग फोडणी करावी व ही फोडणी त्या मिश्रणावर ओतावी.चांगले कालवावे.
सर्व्ह करताना खोबरे व कोथिंबिर वरुन घालून सजवावी.
कैरी न मिळाल्यास लिंबू किवा आमचूर वापरू शकतो पण अर्थात ते आपले दुधाची तहान ताकावर..

नाहीत

पारंपरिक पाककृती