घर कधीचच दुःखी होत.

वाजवघर कधीचच दुःखी होत

घर कधीचच दुःखी होत
मी निघालो..
धक्का बसला,  थोडासा  भेलकांडलो
कसाबसा सावरलो.

दुखावलेल घर, शेत, गाव सगळ मागे पडू लागल.
परकेपणाचा सल माझ्या आत रुतत होता..
डोळे चुरचुरत होते, पाणावले होते.
बहरलेली झाडे तेवढी मागे  खिदळत होती

आणि ती ?
ती 'आपल्या' घरात प्रवेश करत होती
तिच्या हिरव्या चुड्याची किणकिण माझ्या कानात शिरू नये-
म्हणून मी कानांवर हात ठेवले. 

ही आगगाडी आपली शिटी वाजवत  पुढे पळतच होती.