आंब्याची वाफवून केलेली डाळ.

  • २वाट्या चण्याची डाळ,
  • कैरीचा कीस (कैरीच्या आंबटपणानुसार प्रमाण कमी जास्त करणे)
  • ७/८हिरव्या मिरच्या,ओले खोबरे,कोथिंबिर,साखर,मीठ
  • तेल,मोहोरी,हळद (फोडणीकरता)
४५ मिनिटे
३-४ जण

१. चण्याची डाळ ५-६ तास छान भिजवून घ्यावी.
२. भिजल्यानंतर जरा वेळ पाण्यातून उपसून ठेवावी.पाणी राहता कामा नये.
३. हि डाळ आणि हिरव्या मिरच्या एकत्र वाटून घ्याव्यात,पाणी न वापरता. सरभरीतच वाटावे..
    फार बारीक वाटू नये.
४. फोडणी तयार करावी. तेल, मोहोरी,थोडी हळद घालून हि फोडणी तयार होईल.
५. ह्या फोडणीत वाटलेली डाळ टाकावी. तसेच कैरीचा कीस ,मीठ,साखर घालून परतून काढावी.
६. छान वाफ आल्यावर ओले खोबरे,कोथिंबिर घालून खायला घ्यावी.

लिंबाची पावडर घालून पण ही डाळ करता येते पण कैरीची चवच छान लागते.
डाळ न वाफवता पण ही करता येते ज्याची रेसेपी स्वाती दिनेश यानी दिली आहे पण तशी कच्ची डाळ फार खाववत नाही.
त्यामुळे आमच्याकडे अशी बनवतात...माझी ही आवडती डिश आहे.
बघा करून आणि सांगा कशी होते ते......

माझी सौ आई.