मैफिल

प्रेमात असता एकदा मी
केले न पिण्याचे promise
काय सांगू दोस्तांनो मग
केली प्रत्येक मैफिल miss

आनंदी विरजण पडले अन्
नभातून वीज पडली जशी
प्रेम नशा मज चढली अन्
चुका ही सांगू घडली कशी

मैफिल म्हणजे आधी होते
समाधानाचे एक मंदिर
भुलवुनी सारे मन म्हणे मज
पुन्हा एकदा मागे फीर

ग्लास असे आदळती भरुनी
रात ही तेव्हा न पुरे
ओठासी जब लागे अमृत
शब्द ही पड़ती अपुरे

पिण्यास जमता एकमेका
पुसती 'चढली का रे ?'
दोनाचे जरी चार दिसे तरी
'नाही' म्हणती सारे

प्रभात होता आवरून सगळे
निरोप घेतो साऱ्यांचे
प्रेम मुखावर चढवून
जपतो बंध रेशमाचे   

साठवलेले क्षण नयनी
आज स्वप्न असे ते अधुरे
बोलका जीव अबोल होवे
चकण्यासाठी मन झुरे

प्रेमात पडला एकदा जो
तव पडे अजब हे कोडे
प्रेम असे एक नशा जर
का पिणेच हवे मग सोडे

प्रेम वाटे खोटी शाळा
मज सुटे न याचे गणित
भेटाया हे, गमवा सारे 
का हीच जगाची रीत

नाण्याच्या ह्या दोन बाजू
कोण तयांना मग जोडे
प्रश्न तुम्हा हा करतो यारो
सांगा विचार करुनी थोड़े