तू जेव्हा केसाची लट हलक्या हाताने सावरते
वाऱ्याची झुळुक तिला पुन्हा डोळ्यावर आणून ठेवते
या वेळेस थोडं चिडून पण नीट पुन्हा सावरते
तेव्हा मी तुझ्या जवळ असतो तुला बघत असतो वाऱ्याची मंद झुळुक बनून
माझं नाव काढता कोणी गालात गोड हसते
भेटायला मी येत नाही म्हणून उगाच थोडं रुसते
आठवण तुझी येत नाही या खोट्या भ्रमात फसते
तेव्हा मी तुझ्या जवळ असतो तुला बघत असतो गालावरची सुंदर खळी बनून
तू जेव्हा आरशात स्वतःला बघून लाजतेस
मी जवळ आहे अस नेहमी तुला भासते
केसामध्ये फूल गुलाबाच अलगद खोचतेस
तेव्हा मी तुझ्या जवळ असतो तुला बघत असतो गुलाबाच उमललेलं फूल बनून
तू जेव्हा पहिल्या पावसात ओलीचिंब भिजतेस
थुईथुईणाऱ्या मोरासारखी धुंद होऊन नाचतेस
पावसाचा प्रत्येक थेंब हळूच हातात झेलतेस
तेव्हा मी तुझ्या जवळ असतो तुला बघत असतो पावसाचा टपोरा थेंब बनून
तू जेव्हा सकाळच्या धुक्यात चेहरा माझा शोधतेस
अंगणात असलेल्या मोगऱ्याची फूल परडीत वेचतेस
पानावरील मोत्यासारखा दव नकळत टिपतेस
तेव्हा मी तुझ्या जवळ असतो तुला बघत असतो सकाळच्या धुक्यातला दवबिन्दु बनून
तू जेव्हा पौर्णिमेच्या राती चांदणं मोजत असतेस
मधेच बघून चंद्राकडे लक्ष तुझं वेधतेस
मोजता मोजता विसरली म्हणून नव्याने सुरवात करतेस
तेव्हा मी तुझ्या जवळ असतो तुला बघत असतो चांदण्यातला लुकलुकणारा तारा बनून
तू जेव्हा ओठावर नाव माझं घेतेस
प्रत्येक न प्रत्येक श्वासाला आठवण माझी काढतेस
तळहाताच्या रेषामध्ये आपला येणारा उद्या बघतेस
तेव्हा मी तुझ्या जवळ असतो तुला बघत असतो तुझ्यातला अगणित श्वास बनून
तू जेव्हा फोटो माझा डायरी मधून काढतेस
वाचलेली सगळी पत्र पुन्हा एकदा वाचतेस
''I Love U' ह्या ओळीवर येऊन मन तुझं थांबते
तेव्हा मी तुझ्या जवळ असतो तुला बघत असतो 'I Love U' मधला 'I' बनून