कोण मोठा?...

मन मोहून गेलं,

जेव्हां बघितलं,

मधुर, सुगंधी,

गुलाबी कमल,गोल,

 हिरव्या पानांची,

भोवती मखमल,

अन्‌,तळाशी मात्र..

हीन चिखल,दलदल....

गुलाबाचंही असंच..

मस्त, सुगंधी,

फुलात श्रेष्ठ,मोठा,

अन्‌,पानांआड दडलेला,

अहंकाराचा काटा..

कोण महत्वाचा?

कोण मोठा?..

कमल आणि गुलाब? 

की,चिखल आणि काटा?....