परदेशीचा वसंत

मी सध्या california (u.s.)  येथिल वसंत ऋतू   अनुभवला आहे.

त्याबद्दल थोडेसे.......

परदेशीचा वसंत  अलिकडेच पाहिला

निसर्गाचा साजश्रुंगार मनी खरच भावला.

पानगळीच्या झाडावरी ऐसी जादूगिरी,

पान फुटण्या आधी,फुलांनी लावली हजेरी.

सफेद-गुलाबी नाजुक फुलांचे गोंडे फांदीवरी,

चेरी ब्लॉसमचा नजारा ठसला मनावरी.

तीनच     हप्त्यात झाडावरची पाकळीन पाकळी गळाली,

त्याची जागा पोपटी हिरव्या पानांनी कि घेतली.

परदेशीचा हा वसंत पाहून,मी तर गेले हरखून,

पण न कळत मनांत एक विचार आला दाटून,

कि मायदेशीच्या कोकिळेचे इथे नव्हते कुजन,

आणि देवघरांत चैत्रगौरीचे नव्हते इथे पूजन.

अलकाताई.