ध्यास...

जगण्यासाठी
एक मनाला
ध्यास हवा...

उडण्याआधी
पंखांवर
विश्वास हवा...

झेप घ्यायची
आकाशी जर
असेल तर...

भरून छाती
टिकणारा
दमसास हवा...