क्रिकेट आणि इतर खेळ!

क्रिकेटमुळे इतर खेळांकडे दुर्लक्ष होते हे वाक्य आजकाल सर्वत्र ऐकावयास मिळते. त्यात T-20 वर्ल्डकप आणि IPL मुळे आणखीच भर पडलेली आहे. पण आपल्या देशात इतर खेळांमध्ये इतका पैसा का नाही, त्यांच्याकडे लोकांचे लक्ष लक्षात येण्याइतपत का नाही यावर सखोल चर्चा घडावी यासाठी हा चर्चेचा प्रस्ताव.

कोणकोणती कारणे अशी आहेत ज्यामुळे इतर खेळांकडे लोक वळत नाहीत? यात क्रिकेट या खेळाचा खरोखर काही दोष आहे का? मिडीया किती प्रमाणात दोषी ठरते? भ्रष्टाचार हेच एक मुख्य कारण ठरेल काय? इतर खेळांच्या फेडरेशन्स स्वतः किती दोषी आहेत? याशिवाय आणखी कोणती कारणे असू शकतील काय?