अंगणात माझ्या शंभर झाडं
एक त्यातलं अगदीच वेड
गंमत काय, गंमत काय?
त्याला काही कळलंच नाय!
सूर्यही उठतो आता लवकर
सारंच दिसतं आता सुंदर
अचानक झाली गंमत काय?
वेड्याला तर कळलच नाय!
खारुताई दुडदुडते
चिऊताईही चिवचिवते
सार्यांना या झालंय काय?
झाडाला काही कळलंच नाय!
एके दिवशी गंमत झाली
फांदीवर त्याच्या कळी फुलली
आता त्याला लक्षात येई
'वसंत' नाचत गात येई!
म्हणे वेडा स्वतःशीच मग,
"म्हणून सारे दिसते सुंदर
गंमत काय, गंमत काय,
मला काही कळलच नाय!"