वारा ,जमीन ,पाणी ,
ही माती
हे मोकळे चिरंतन आकाश
तू ,मी,
हे हजारो मैल पसरलेले प्राचीन रस्ते
ही अयोध्या,
ते पंढरपूर
या मथुरेच्या सनातन गल्ल्या
हे अजमेरशरीफ,
तो गयेतला प्राचीन बोधीवृक्ष,
हा सार्वभौम आणि अभेद्य रायगड
बंधो,
वाटू म्हणता वाटून घेता येणार नाही
तुला हा पुरातन देश,
आणखी किती दिवस हा द्वेष ?
विभ्रम ....