हरि रे...

हरि रे हरि, दु:ख हरी,

हरि रे हरि, क्लेष हरी,

हरि रे, तव मुरलीच्या ,

स्वरलहरी दु:खहारी...

हरि रे हरि, वेळुवनीं

घुमणारी वंशरी,

रे सुरेल जादुगिरी,

मोहिनी मनावरी...

श्यामवर्ण यमुनेच्या

दर्दभऱ्या अंतरी,

हरुनी सर्व दु:ख सख्या,

भरुनी टाकी माधुरी...

हरि तुझिया मुरलीतुनी,

स्वरवलये साकारुनी,

दावी तव मूर्त सगुणी,

पाही रे हासुनी...