उद्या नसणार तु सोबत माझ्या,
उद्या नसणार त्या गप्पा तुझ्या-माझ्या
नसेल कदाचित एकत्र फिरणे,
नसेल आपल्या कानगोष्टी सांगणे-
जाल्यावर जग , तुझे-माझे वेगळे
सुन्नसुन्न वाटेल रे मला सगळे.....
तेव्हा आठवेल आपले एकत्र रडणे- हसणे,
आणि ते छोटे मोठे रुसवे फुगवे.
उद्या असेल एकटी मी,
आणि सोबत तुझ्या आठवणी
हळुच जाईन मग कल्पनांच्या झुल्यावर
करेन प्रेम भरभरून तुझ्यावर.....
फिरेन वाट संपेपर्यंत तुझ्यासोबत पुन्हा देउन जाशील खुप आठवणी,
एकाकी वाटल्यावर मला फ़ुलवण्यासाठी.......