मक्याची कोशिंबीर

  • स्वीट कॉर्न चे एक पाकीट अथवा एका मोठ्या कणसाचे दाणे
  • एक मध्यम आकाराचा कांदा
  • दही
  • कोथिंबीर
  • मीठ
  • साखर
१५ मिनिटे
४-५ जणांना २ वेळा वाढता येईल

अमेरिकन गोड मक्याचे दाणे मिक्सर मधून फक्त एकदाच फिरवून काढावेत. त्याचे बारीक पीठ करू नये.

त्यात बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालावी. दही घालावे. चवीप्रमणे मीठ आणि साखर घालावी.

सजावट आणि थोडी वेगळी चव हवी असेल तर वरून किंचित लाल तिखट आणि जिरेपूड भुरभुरवा.

माझी जाऊ.......... ऱाजश्री