धपाटे

  • २ वाट्या बाजरीचे पीठ, १ वाटी ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी कणिक, अर्धी वाटी बेसन
  • १०-१५ लसूण पाकळ्या, ७-८ हिरव्या मिरच्या[ आवडीनुसार], मूठभर कोथिंबीर
  • १ मोठ चमचा तीळ, मीठ आणि तेल
३० मिनिटे
३-४ जणाना

प्रथम लसूण, मिरच्या आणि कोथिंबीर वाटून घ्यावी. त्यात सर्व पीठे, तीळ व मीठ घालून

 भाकरी सारखे पीठ भिजवावे.  पोळपाटावर ओले फडके पसरून त्यावर ओल्या हाताने धपाटा

थापावा व तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूनी भाजावा.

शेंगदाण्याच्या दह्यातील चटणी बरोबर मस्त लागतो.

सासूबाई