मसालेदार भेंडी

  • अर्धा किलो भेंडी, ३ कांदे, १ मोठा टोमॅटो, २ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा लसूण पेस्ट
  • १ चमचा गरम मसाला, १ चमचा धणे पूड, १ चमचा लिंबाचा रस, तिखट-मीठ
  • तळणासाठी तेल
३० मिनिटे
३-४ जणांना

प्रथम भेंडी स्वच्छ धुवून व पुसून घ्या. पाव इंच लांबीचे तुकडे करून तेलात तळून घ्या.

कांदे, टोमॅटो, मिरची सर्व बारीक चिरून घ्या. थोड्या तेलात कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.

त्यात लसूण, मिरची व टोमॅटो परतून घ्या. त्यात गरम मसाला   व धणेपूड घाला. तेल सुटेपर्यंत

मसाला परता.नंतर त्यात तळलेली भेंडी, लिंबाचा रस व मीठ घाला. चांगले मिक्स करा व

गरमागरम वाढा.

ही भाजी दिसायला व चवीला छान असते. जीरा राईस, दाल फ्राय बरोबर मस्त बेत जमतो.

कुठेतरी वाचली होती.