" बाबा म्हणे....."

नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी......... नाचू......!!!

'काला कौवा... काट खायेगा.... ', जीभ काढित्यात हो लोकं, जीभ? प्राण्यांमध्ये जीभ काढणारा मी एकच प्राणी पाहिला आहे....कुत्रा. आता जर का मी एखाद्याला म्हटलं ना, टाळ नीट वाजव, तर तो म्हणेल, 'महाराज, ही घ्या तुमची टाळ, ही घ्या तुमची माळ, आता आपली भेट सरळ नवरदेवासमोर, वन्स मोर, "काला कौवा".

काय लोकं आहेत? आज कालचे तरुण मुलं बघा तुम्ही, काय राहणीमान आहे त्यांचं? हा आपला १८ ते २२ चा पट्टा पार संपला आहे, त्यांचं काय होईल कुणास ठाऊक? एकालाही स्वतःच्या हिमतीवर जगण्याची अक्कल नाही. त्यांनी राहून दाखवावं घराच्या बाहेर, आई-वडिलांच्या कमाईशिवाय, स्वतःच्या कमाईवर फक्त १ वर्ष. मग पिऊन दाखवा टँगो, आणि मग उडवा गाड्या.

आपलं कीर्तन म्हणजे काही लेच्या-पेच्याचं काम नाही, हे जहरी इंजेक्शन आहे, "होईन त्रास, पण गुण हमखास".

तुम्ही जा शेजाऱ्याकडे दूध मागायला आपल्या घरी पाहुणे आल्यावर. कपात दूध देतो तो, त्या कपात दूध बघण्यासाठी ढुंकून बघावं लागतं हो. आता कप पाहिला तर एवढासा आणि त्यातही ढुंकून बघावं लागतं हो.आणि तरी तो शेजारी आपल्यावर उपकार केल्याची भाषा करतो. आणी आपलं बघा....!!! आईच्या शरीरात एक थेंब दुधाचा तयार व्हायला तिच्या शरीरातलं ३ थेंब रक्त लागतं, ३ वर्ष आपण त्या मातेचं दूध प्यायलो, प्रत्येकाने जगताना लाज धरली पाहिजे की आपण कसे जगतो? शरीराच्या कातडीचं जोडं शिवलं तरी आपल्या आई-वडिलांचे उपकार फिटणार नाहीत. काहींनी आई-बापांना हाकलून सासू-सासऱ्यांना आणून ठेवलं आहे घरात. ज्यांनी आणून ठेवलं आहे त्यांनी आजची रात्र राहू द्या त्यांना, सकाळी त्यांची पिशवी हातात द्या आणि सांगा, 'ईंदुरिकर महाराज येऊन गेला, आम्हाला लय खणकावलं, आता तुम्ही निघा.

हा विनोद नाही, हा टाईमपास नाही. तुम्ही बघा, भांडण आणि स्वयंपाक ह्यांचं घनिष्ट नातं आहे. "लग्न होण्याच्या पूर्वी तर मारे फोन करायचा, कट झालां तरी हॅलो म्हणायचा. राणीसारखं ठेवीन म्हणायचा". 'आता थापते आहे राणी भाकरी'. पण मी सोडणार नाही, असाच जाळून मारीन. मेला रे मेला.

तुम्ही जरा एका ठिकाणी शांतपणे बसून जरा विचार करा, आपल्याला आयुष्यात, कोण-कोण बोललं असेल, शिव्या दिल्या असतील, पण बायको इतकं वाईट आपल्याला कुणी बोललं नसेल हो.इज्जतदार माणूस सकाळ पर्यंत जिवंत दिसणार नाही. तो एक तर रेल्वेच्या रुळावर झोपेल नाही तर गळ्याला फास लावेल. पण ज्याला इज्जत नाही, तो म्हणतो खरं आहे, मी गाढव आहे.  पण आपलं दुर्दैव हे की, आपला मुक्कामही त्याच घरात आहे हो.

एक लक्षात ठेवा, वडिलांनी मुलाला रागावल्यानंतर आईने काही काळ तरी राग धरून ठेवला पाहिजे, तरच मुलावर रागावल्याचा फरक पडतो. पण आपलं सगळं उलट आहे, वडील मुलाला रागावले की आई मुलाला म्हणते, " काही चिंता करू नको पिंट्या, तुझ्याबरोबरची भरपूर मुलं नापास होऊन तुझ्या मागच्या इयत्तेत आहेत, तू नापास झाला तरी चालेल. तुझा बापही असाच होता, माझ्याच शाळेत होता, माझे उत्तरं बघून पास व्हायचां, विचारून घे त्याला".

हा... हा... हा....!!! त्याचं काय? ते ही खरंच आहे, @ पोस्ट लव मॅरियेज, मुक्काम पोस्ट सासरवाडी.

काही लोकं म्हणतात, तो लय श्रीमंत आहे, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे. तू खूप सुखी आहे. काय लोकं आहेत? तो श्रीमंत आहे म्हणून का तो पैसे खातो का? जेवणंच करतो ना तो? चपाती भाजीचं खातो ना? एवढं आहे त्याची गॅसची असेल, आपली चुलीची असेल. का श्रीमंताच्या पोटात कप्पे आहेत? का त्याच्या पोटा चपाती तिरपी जाते. काहीही बडबडतात लोकं. अहो, महाराज म्हणतात, " औट हात तुझी जागा".

मी म्हणतो, " चार खांदा देणारी माणसं, एक मडकं, चार बांबू, थोडं रॉकेल, थोडं पाणी आणि एक रुपयाचं नाणं.... दॅट इज दी व्होल प्रॉपर्टी ऑफ मॅन. लाख श्रीमंत मेले हो, घेऊन गेले का काही त्यांच्यासोबत? रावण ज्याची लंका सोन्याची होती, ज्याला ऐंशी हजार बायका होत्या आणि ज्याच्याकडे गडगंज संपत्ती होती असा रावण... मेला हो मेला.... मेला रावण. घेऊन गेला का काही?

तुकाराम महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय.....!!! म्हणतो ना आपण असं? का म्हणतो? हे लोकं लय शिकले का? ह्यांच्याकडे भरपूर डिग्र्या होत्या का? आपल्या डिग्र्या फक्त दरवाज्याबाहेर टांगण्यासाठी... श्री. अमुक-तमुक... एम. ए., पीएचडी, एम. फिल.... वगैरे वगैरे....!!! तुम्ही बघा, ज्ञान कुणी बदलू शकलं आहे का? लाख गुरुजी झाले, लाख गुरुजी मेले, काही रिटायर झाले, काही होतील आता, पण 'ग' 'गवताचाच'. सगळे गुरुजी गेले, पण 'ग' मध्ये बदल घडवू शकले नाही.

ह्या जगात उपकार फक्त ३ लोकांचेच, बाकी सगळे भामटे. आई, वडील आणि संत. जो ज्या कामासाठी आला त्याने ते काम केलंच पाहिजे, त्यात काही उपकार आहे का? कुणी म्हणेल, मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुकान चालवतो, उपकार आहेत का? बंद करून घे भाऊ. दुसरा उघडं ठेवेल दुकान. विद्यार्थ्याने अभ्यास केला, उपकार आहे का? नको करू नापास होशील. ज्याने त्याने त्याचं काम केलंच पाहिजे.

भारतीय संस्कृती बघा तुम्ही, स्त्रीने डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे, कश्या सुंदर दिसतात बघा? पदर तर साडीसोबतच विकत भेटतो ना? का नवीन विकत घ्यावा लागतो? नाही ना मग घ्यायला काय हरकत आहे? आपण लोकं कोण आहोत? तुकाराम महाराज ज्या रस्त्याने गेले, ती माती विठ्ठल-विठ्ठल गाईली होती, एक मन सोन्यासाठी बायको आणि मुलगा विकला लोकहो...., घरात अन्न शिजवायला नाही, स्वतःच्या मुलाला मारून मांस शिजवलं, तर महाराज म्हटले... मी निपुत्रिकाच्या घरचं अन्न खात नाही... ‌ शिवाजीराजांना पाहिलं नव्हतं, तरी तो सरदाराचा मुलगा म्हणतो, "खबरदार, जर जाल पुढे, उडवीन चिंधड्या राइ-राई एवढ्या... ". आपण लोकं कोण आहोत? आणि आपल्यला शोभतं का चप्पल घालून स्वयंपाक करण? आता कोणतं ते जेवण निघालं आहे, बफे का फफे. उभं राहून जेवतात हो लोकं. पुढच्या वर्षी नवीन जेवन निघेल, पसरे जेवण..... आडवं व्हायचं आणि नाकाने रस्सा ओढायचा.... काय लोकं आहेत?

आजकालची शिक्षण पद्धती बघा तुम्ही, नुसते टोणगे तयार करते आहे. तू उठ रे? तुझे वडील शेतकरी आहेत का? "हो". मग सांग बैलाला पुढचे दात किती? " माहीत नाही". त्याला काय माहित असणार? कारण त्याने कधी बैल पाहिलाच नाही, कॉलेजात जातो ना तो. आणि त्यात त्याचा ही दोष नाही, त्याला फक्त 'आई' ज्याला 'बैल' म्हणते तो बैल माहित आहे. तू सांग रे, सोपा प्रश्न विचारतो.

'एका विहीरीतून एक बादली पाणी काढायला, ३० फुट दोर लागतो तर ३ बादली पाणी काढायला किती दोर लागेल? " ९० फुट". तुम्हिच सांगा परवडतं का हे ठेवायला घरी? सांग भाऊ, शक्तिमान किती वाजता असतं? " रविवारी १२ वाजता". आणि कुंती? "३ वाजता". आणि कानामागून आली? "बंद झाली".

हा... हा...!!!! धन्य आहे बाबा, धन्य आहे ......!!! घरिही खातं आणि आता तर शाळेतही खातं... काय म्हणतात ते ? हां खिचडी.

बुद्धिमान माणसाची किम्मत बुद्धीमानामध्येच राहते ती कधीच कमी होत नाही. कमी अकलेच्या माणसांमध्ये ती आपोआप कमी होते. तुम्ही बघा, १ दारुडा शंभर किर्तनकारांना बोलू देत नाही, तो म्हणतो, 'वारकरी काय लायकिचे आहेत हे मला माहीत आहे, त्यांच्यात एवढी दमख आहे तर त्यांनी पिऊन दाखवावी'. म्हणजे आमची गिताही गेली, गाथाही गेला आणि ५ रुपयात तो आमचा बाप झाला.

तुम्ही सांगा, वाईट गोष्टी शिकवाव्या लागतात का? 'दारू पितांना डोळे झाकावे, पिल्यानंतर एखाद्या गटारित लोळावे आणि आपणच आपला पायजामा ओला करावा'. लिहिलं आहे का कुठे? डोळे वाईट गोष्ट बघत नाही, पण आपण एवढे नालायक डोळे मिटतो, पण दारू सोडत नाही.'गांजा बांधणारा माणूस बारिक असावा, त्याने डाव्या हाताने, अंगठ्याने गांजा चोळावा, मग त्याने जोरदार झुरका मारल्यावर जोरदार झटका द्यावा'. लिहिल आहे का कुठे? आणि अजून त्या श्रीमंतीचं काय घेऊन बसला आहात तुम्ही? एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला मोबाईलवरून सांगतो, 'मी गल्ली नंबर २ मध्ये आहे तू कुठे आहेस? मी ५ मिनिटात शंकराच्या देवळामागे येतो, तू तिथे गांजा घेऊन तयार रहा'. मग सुरू बम, बम भोले.

इति समाप्ति, बाबा म्हणे. (बाबा- ईंदुरिकर किर्तनकार महाराज). ईंदुरिकर महारज की जय.