मटाराच्या करंज्या

  • आवरणासाठी :-२ कप कणीक, लाल तिखट, मीठ, हळद व तेलाचे मोहन
  • सारण साहित्यः-१ कि. मटार, ७-८ हिरव्या मिरच्या, मूठभर बरीक चिरलेली कोथिंबीर,अर्धी वाटी ओले खोबरे,२ चहाचे चमचे खसखस, मीठ ,साखर
  • तळणासाठी तेल
१ तास
३-४ जणाना पोटभर

प्रथम कणकेमध्ये तिखट, मीठ, हळद व तेलाचे मोहन घालून पीठ घट्ट भिजवावे. हे पीठ अर्धा तास

झाकून ठेवावे.

थोड्या तेलाची फोडणी करून त्यात मटार घालावा. वर पाण्याचे झाकण ठेवावे.

खोबर, कोथिंबीर, मिरची व मीठ एकत्र वाटून घ्यावे. खसखस जरा भाजून वाटून घ्यावी.

मटार शिजल्यावर सर्व वाटण त्यात घालून छान परतावे. झाकण ठेवून एक वाफ आणावी.

नंतर कढई खाली उतरवून, अर्धा चमचा साखर घालून सारण गार होऊ द्यावे. थोडे गार

झाल्यावर कणकेच्या बेताच्या आकाराच्या पुर्या लाटून त्यात मटाराचे सारण भरून करन्ज्या

कराव्यात. तापलेल्या तेलात तळाव्यात.

१] ज्याना कांदा, आले-लसूण आवडत असेल, त्यानी मटार शिजवण्या आधी थोडा बारीक चिरलेला

कांदा फोडणीत घालून गुलाबी रंगावर परतून मग मटार घालावा. आणि खोबर-कोथिंबीरीबरोबर

आले-लसूण ही वाटावे. कांद्यामुळे मस्त चव येते.

२] कच्चा मटार वाटून शिजवला, तरी चालेल. त्याचीही चव चांगली लागते.

३] या करन्ज्या २ दिवस टिकतात......... पण शिल्लक राहिल्या तर!

माझी कै.आई