तू

नेहमी मी तूझी वाट पहायचे

तूझ्या विचारात हरवून जायचे

अशाचवेळी अचानक तू यायचास

मी काहितरी बोलनार इतक्यात

नजर झूकवून  तू गोद हसायचास

मग ओठावरचे शब्द

तसेच रहायचे स्तब्ध

आता तेच शब्द कागदावर उतरवत आहे

सांगशील ना तूझ्या मनात तरी काय आहे