चालूच सारखा हाईड ऍण्ड सीक!!
चालूच सारखा हाईड ऍण्ड सीक!!
प्रश्न-उत्तर, विचार-कृती
रूटीन-बदल, गरज-स्मृती
गोंधळ तेवढा उडत नाही, म्हणून खरंच सगळं ठीक!
चालूच सारखा हाईड ऍण्ड सीक!
शब्द-अर्थ, सत्य-भास
जगणं-मरणं, श्वास उच्छवास
सगळं असतं बरोबरीनंच, तरीही नाहीच सापडत लिंक!
चालूच सारखा हाईड ऍण्ड सीक!
करण्याची इच्छा-मिळणारी संधी
प्रेम-पारख, सोबत-धुंदी
यांचा गुंता सुटतच नाही, सापडतसुद्धा नाही ट्रिक!
चालूच सारखा हाईड ऍण्ड सीक!
थोडंसं-आणी बरंच काही
सांगावं म्हटलं, तर काहीच नाही
स्पष्ट बोलणं शक्यच नसतं, हाच तर आपला पॉईण्ट वीक!
चालूच सारखा हाईड ऍण्ड सीक!
पण आज ना उद्या, उद्या ना आज
दडलेलं सापडेलच, मग आपलाच राज!
फिरेलच की एखादी, मॅजिकची स्टीक!
चालूच सारखा हाईड ऍण्ड सीक!!