पेठ्याचे लाडू

  • १ कि. तयार पेठा, अर्धा कि. सुक्या खोबर्याचा कीस, व्हॅनिला सुगंध
३० मिनिटे
२५-३० नग

पेठा किसून त्यात खोबर्याचा कीस आणि व्हॅनिला सुगंधाचे काही थेंब घालून लाडू वळा.

पेठा मिठाईच्या दुकानात मिळतो...... तोच आग्र्याचा सुप्रसिद्ध पेठा! मुळातच खूप गोड असतो,

त्यामुळे या लाडू साठी वेगळी साखर नको.

सुक्या खोबर्याचा कीस अगदी पांढरा शुभ्र हवा. बाजारात मिळणारा वापरलात , तर उत्तम!

भोंडला, मुलांची पार्टी किन्वा किटी पार्टी साठी छान प्रकार आहे. 'ओळखा पाहू" अशी गंमत

पण करता येईल.

एकदा करून पहाच!

मावस सासूबाई