ऐकावे ते नवलच - शाकाहारी मासे (!)

ऐकून नवल वाटले ना? पण जर्मनी आणि बऱ्याच युरोपीय, आशिया राष्ट्रात मासे शाकाहारी पदार्थात मोडतात.

याबाबत मी माझ्या एका शाकाहारी जर्मन मित्राबरोबर चर्चा ही केली. त्याचे म्हणणे होते आपण जशी भाताची शेती करतो तशी माशांचीही शेती (मत्स्यशेती) होते की.  त्याला म्हटले, तशी तर कोंबड्यांची, डुकरांचीही होते की.  मासे काही झाडावर येत नाहीत. त्यांना फुले, फळे नि पानेही लागत नाहीत. त्याला माझे म्हणणे पटले.

पण मला कुठेतरी वाचल्याचे आठवते. आपल्याकडे बंगालामध्येही माशांना शाकाहारी समजतात. त्यांना 'जलपुष्प' म्हणतात. याचे एक कारण असेही आहे की तिथे खूपच जलवर्षाव अथवा पाऊस होतो. बरेचदा पूर येतो.  त्यामुळे अशावेळी शाकाहारी लोकांना चांगल्या नि निरोगी भाज्या मिळणे दुरापास्त होते. म्हणून त्यांना मुबलक अशा माशांवर भूक भागवावी लागते.