कावळा, फांदी

कावळा बसला म्हणून

फांदीनं न तुटण्याची शर्थ केली...

थोड्या वेळानं, कावळ्याला हाकलून

माणसानंच ती तोडून नेली....

लोक उगाचच म्हणतात

कावळा बसला अन फांदी तुटली !