-----का?

निर्मोहाचे जाळे विरले--
कितितरी दिवसांनी
----ते तरि कधि विणले होते का?

कधी नव्हे ते वृक्षहि चळले
---ते तरि कधि अविचल होते का?

नाजुक कवळी मोहक पाने
अकाल ती पण पिवळी झाली
---ती तरि कधि हिरवी होती का?

लोभसवाणा वादळवारा
कळला वळला-- का मग गळला?
---तो तरी कधी भिनला होता का?

हलकासा एक चक्रावर्त
--दीपही तेवे संथ लयीत
---------निमिष तयांचे नियतविधी का?