संवेदनशील पत्रकार, शोषित-विस्थापितांशी नाळ जोडलेला कार्यकर्ता, मर्मज्ञ संगीत रसिक, विचक्षण अभ्यासक, नर्मदा बचाओ आंदोलन आणि जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाचा विचारस्तंभ आणि आपल्या सर्वांचे मित्र संजय संगवई आपल्यातून जाऊन आता एक वर्ष होत आहे. संजय संगवई यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या निमित्ताने, संवेदनशील पत्रकारितेचा वेध माध्यमांच्या आणि माध्यमकर्मींच्या अंतरंगातून घेण्याचा कार्यक्रम आयोजित करत आहोत. संजयची स्मृती जागवण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे हार्दीक आमंत्रण.
संवेदनशील पत्रकारिता : माध्यमांच्या अंतरंगातून
समाज परिवर्तनाच्या चळवळीशी नातं मानणाऱ्या पत्रकारांशी संवाद
सहभाग
आनंद आगाशे, संपादक-संचालक, सकाळ वृत्तपत्रसमूह
प्रा. जयदेव डोळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
प्रतिमा जोशी, विशेष प्रतिनिधी, महाराष्ट्र टाईम्स
नरेंद्र लांजेवार, मुक्त पत्रकार
संवादक : माधव गोखले आणि मिलिंद चव्हाण
(आयोजक : संजय संगवई अभ्यासवृत्ती समिती, नर्मदा नवनिर्माण अभियान आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ)