माझे शिक्षण

MBA करत असताना मी जे काही शिकलो त्याचा मला कधी फायदा होईल तेव्हा होईल पण सध्या तरी त्या आठ्वणी आहेत आणि त्या आठवून मी नेहमी हसत असतो.

माझं कॉलेज ग्रामीण भागात आहे तिथे अपवादाने लेक्चर व्हायची शिकणारी फार थोडी होती आणि शिकवणारे तर असून नसल्यासार्खेच होते. एक प्रसंग आजहि माझ्या डोळ्यासमोर आला की मला हसू येते.

लेक्चर सुरू होते मी मागच्या बाकावर बसून निरिक्षण करत होतो समोर अकाउंटचं लेक्चर सुरू होतं आमचं आपलं कागद फेकणं सुरू होतं तेवढ्यात सम्या खिदळला आणि मास्तर पाठमोरा असतानाचं मराठीतच ओरडला.....

कुणाची माय व्यायली आहे माझ्या लेक्चर ला दंगा करायला....

माझ्या तोडूंन नकळत गेलं

सर तुमचीच..... 

सरांनी रागानी बघितलं तसं दत्त्या चळबळलं आणि म्हणलं सर पाठीमागून कुणीतरी बोललं...

मी आणी सम्या मान खाली घालून हसत होतो तसं सरांनी मला विचारलं....

सांग शिदें कोण म्हणालं असं..

मी गरिबासारखा उभा राहिलो तसं सम्या मला डिवचायला लागलं 

मी म्हणालो..सर मी कधी असा म्हणीन का तुम्हाला....

वेळ पडली तर तुमच्या तोडांवर म्हणेन पण असं नकळत नाही म्हणणार...

ते मला माहीत आहे मग तू सांग कोण म्हणालं ते...

आता मला काय माहित कोण म्हणालं ते..

सर रागाने लाल झाले म्हणाले... तुला माहित आहे कोन म्हणालं ते तु सांग घाबरू नकोस मी पण पवार आहे तुझ्या अगांला हात लागू देणार नाही..... तुला पोलिस प्रोटेक्शन देतो तू सागं...

असा म्हणल्यावर सम्या जास्तच डिवचायला लागलं.....

मग दत्या म्हणलाच कि तिकडूनच आवाज आला मग सम्या चिडला आणि म्हणला....

हो आला आवाज इकडूनच मग तुज्या बापाचं काय गेलं....

तसं मास्तर चिडलं

म्हणालं समर, शिदें आणि दत्ता बाहेर जा..

आणि डायरेक्टर सरांच्या परवानगी शिवाय आणि मला नाव कळल्याशिवाय तुम्ही माझ्या लेक्चर बसू शकणार नाही...

सम्या चेकाळला... म्हणला चला सुट्लो..

मला म्हणाला चल बाहेर जाउ चहा बी मारू पण मी हललो नाही म्हणालो हा अन्याय आहे मी नाही बाहेर जानार...

सर म्हणाले मग या सेमिस्टर चा सिल्याबस संपला असा मी डिक्लेअर करतो... आणि सर बाहेर गेले

मग सगळेच बाहेर पडलो सम्या धुसपुस करायला लागला..

म्हणाला आज दत्याला धरायचा... प्लान कर... मी बरं म्हणालो..

मग प्लान केला कि आज होस्टेलवर आज दत्त्याला धरायचा..ओके झाला...

मग सध्यांकाळी सगळी तूर्र झाली आणि गेलो मग..

दरवाजा वाजवला... दार उघडाना कुणी तसा सम्या लाथा मारायला लागला..

मग लाईट गेली आणि दरवाजा उघडला मी आत गेलो सगळी आत आली...

दत्त्याच्या बेडवर कोणतरी झोपलं होतं..

मग काय टाकली चादर आणि झाली सगळी सुरू....

१५-२० मिनिटानी सगळी बाहेर..जसा बाहेर पडलो तसा दत्त्या आत आला.. आम्ही भाबांवलो आणि आता मारायच्या मूड मधी पण कुणी नव्हतं..

कुनीतरी विचारलं तुज्या जाग्यावर कोण झोपलयं.... तर म्हणला मघाशी रेक्टर आला होता रुम शिफ्ट करायला लावली मी माझं सामान तिकडं नेतोय.. माझ्या जाग्यावर डिप्लोमा चं पोरगं आलयं...

असं ऐकल्यावर आम्ही सुसाट.... परत १५ दिवस नो कॉलेज....

बाकी नतंर सागंतो..... फोन आलाय...