पत्र

पत्र

बरोबरीने श्रावणधारा अंगांगावर घेशिल ना



सांग साजणी मनातले तू माझ्यासंगे येशिल ना




सचैल न्हाल्या वेली अवघ्या सख्या बिलगतिल सुखावुनी


तूही संपविण्यास दुरावा हाती हाता देशिल ना




कधी हसू कधि शांत बसू अन् कधी गुणगुणू बालकवी


हृदयी गुंजन तव नामाचे ! वेध तयाचा घेशिल ना




निमित्त केवळ जलधारांचे; गगनाची धरणीस मिठी


काय चिंतिसी - 'आपल्यातही असेच काही होइल ' ना ?




सरींमागुती लपती छपती उन्हे पिऊया जोडीने


हवेत ओल्या कवेत माझ्यासवे शहारुन जाशिल ना




जन्मच आहे श्रावण अवघा कळेल का हे तुला कधी


उन्हे कोणती पाउस कुठला अर्थ पारखुन घेशिल ना


(या दोन ओळी असाव्यात की नसाव्यात याबद्दल द्विधा आहे)






[ एकदा वाचल्यानंतर पुन्हा एकदा वाचावी वाटली का ?  जरूर सांगा.]