आज

आज रहायचं आहे असं
जसं उद्या जायचं नाही कुठं
तुझ्याबरोबर माझ्यासाठी

आज झोपायचं आहे असं
जसं उद्या ना! नाही उठायचं
स्वप्नांमध्येच पाहण्यासाठी

आज क्षणाला पकडायचंय असं
समजून ते शक्य आहे तसं
पुन्हा पुन्हा तो जगण्यासाठी

आज आवरायचं आहे असं
जसं उद्या नाही परतायचं
तुझा-माझा पसारा पाहण्यासाठी

रोहन जगताप

दुवा क्र. १