शेंगदाणे, तीळ चटणी

  • १ वाटी शेंगदाणे
  • १/२ वाटी तीळ
  • १०ते १२ सुक्या लाल मिरच्या
  • १ मध्यम गड्डी लसूण
  • मीठ
३० मिनिटे

शेंगदाणे व तीळ वेगवेगळे खमंग भाजणे.गॅस न लावताच लाल मिरच्या दाणे तीळ भाजलेल्या गरम कढल्यात घालून थोड्या परतणे.कढल्याच्या तेवढा गरमपणा पुरतो.
मिक्सर मध्ये तीळ आधी फिरवून घेणे त्यावर दाणे, मग मिरच्या आणि शेवटी लसूण घालणे.मीठ घालणे.
सगळे  भरडच वाटणे.
घट्ट झाकणाच्या काचेच्या कोरड्या बरणीत भरून ठेवणे.

अतिशय खमंग ऑलपरपज चटणी !
भाकरीपासून वड्यापर्यंत कशाही बरोबर मस्तच!

.