सागरा प्राण तळमळला, पुन्हा तळमळला
वीरोत्तम तो, बुध्दिमंत ही होता,
गुणवानही तो, विद्या अवगत कर्ता (१)
साहित्यिक तो सुंदर त्याच्या रचना,
धगधग त्यांची जागवी जनी चेतना (२)
संसारी तो भार्या पुत्र ही होते,
बंधुचे ही दॄढ होते ते नाते (३)
जरि इच्छिता सुखवस्तु हे जीवन
धन मान नोकरी घेई पायी लोळण (४)
परि मोह तयाला नव्हता,
झिडकारुनी माया ममता,
स्वातंत्र्य प्राप्ती करिता,
लढण्यास ही तो, किंचित ना डगमगला,
सागरा प्राण तळमळला, पुन्हा तळमळला
लढवय्या तो प्रखर देशभिमानी,
परकियांसीहि धाक तयाचा मनी (१)
हादरली ती महसत्ता वीरगर्जने,
त्या बंधुनी ते नेती अंदमाने (२)
काळ्या पाण्याची कठोर शिक्षा भोगी,
कनकासम तेज पावला योगी (३)
मग आली पहाट स्वातंत्र्याची,
लटपटले लोभी धरुनी आस सत्तेची (४)
जरि महान त्यागी होता,
सत्ताधीशांची अहंता,
अपमानित त्यांसी करिता,
अभिमन्युसम तो जनकल्यणा झटला,
सागरा प्राण तळमळला, पुन्हा तळमळला
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना अनेक प्रणाम.
-विवेक.
कृपया इथे टिचकी मारा
सागरा प्राण तळमळला