एक दिवस


प्रातःकाली सूर्य उगवला अणी घरात उजेड आला
मनात म्हंटले अजून एक दिवस आपल्या पुढे आला
पक्ष्यांचा चिवचिवाट मन प्रसन्न करून गेला
उमल्त्या फुलांचा सुगंध मनात घर करून गेला
आज काय काय करायचे हा विचार मनात सुरू झाला
हा विचार करता करताच अर्धा दिवस गेला
घरची कामे उरकून बाहेर निघालो तर काय बघतो
सुर्याही माझ्या सोबतीने लगोलग निघाला
डोंगर दर्याँतून विहार करतांना मनात विचार आला
हा एकांत माझ्या सोबत कधी निघाला?
भटकंती करून परत यायला निघालो तर काय
चंद्र नावाचा आजून एक सोबती वाटेत येतो म्हणाला
मी म्हंटले ठीक आहे तू सोबत चल
पाहतो तर काय तो सुर्याला सोबत घ्यायला विसरला!
मी त्याला विचारले असे का रे केलेस?
उलटून म्हणतो कसा आम्हा दोघांना तू रे कधी एकत्र पाहिलेस?
विचार करू लागलो सूर्य किंवा चंद्र कोणी का असेल
घरी परत जाताना ह्याची ही सोबत चालेल
चंद्राची ओळख होई पर्यंत घरी पोहोचलो
बघता बघता थोड्याच वेळात गादीवर पहुडलो
डोळे उघडून बघतो तर काय?
कालचा मित्र सूर्य दारात उभा होता
डोळे वटारून म्हणाला कालचा तो माझा मित्र चंद्र कसा होता?