पतंग

आकाशी भरारी मारते पतंग
उंच उडायला शिकाविते पतंग
कागदाचे विविध आकार दर्शविते पतंग
उडवणार्याची मान उंचाविते पतंग
दोर ढीला सोडताच भरकटते पतंग
जिवनाचे हे मुल्य दर्शविते पतंग
उँची गाठता स्थिरवते पतंग
विचारी पुरुषाची खोली सांगते पतंग
नभी जाताच लहानाच्या ओठावर हास्य देते पतंग
मोठ्यानाही लहान करून जाते पतंग