मुलांची अधोगती होते आहे का?

अलीकडच्या दोन दिवसांत बारावीच्या परीक्षांच्या निकालाच्या बातम्या येत आहेत. या निकालामध्ये गुणांचे प्रमाण आणि उत्तीर्णांचे प्रमाण यात मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक आहे. परीक्षांमधील अनुपस्थितीमध्येही मुलांचे प्रमाण अधिक असल्याचे म्हटले आहे. यावरून मुलांची अधोगती होत आहे का, असल्यास  त्याची काय कारणे असतील , मुख्य म्हणजे हा प्रकार केवळ आपल्याकडेच आहे की विदेशातही आहे, पारंपरिक शिक्षणासारखीच परिस्थिती तंत्रशिक्षणातही आहे का असे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले. एकूणच या परिस्थितीबद्दल मनोगतींना काय वाटते?